मणेरीला जोडणाऱ्या दळणवळणाच्या सुविधा
दळणवळणाच्या सुविधा गावाशी संपर्क साधण्यासाठी आणि गावाच्या सर्वांगीण विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. २०११ च्या आकडेवारीनुसार, मणेरीमध्ये सार्वजनिक बस सेवा उपलब्ध आहे, जी मुख्यतःसावंतवाडी आणि दोडामार्ग यांच्याशी गावाचा संपर्क साधते. शिवाय, गावाजवळ खाजगी बस सेवा मर्यादित प्रमाणात उपलब्ध आहे. रेल्वेने प्रवास करण्यासाठी जवळचे रेल्वे स्थानक सावंतवाडी ३०-३५ किमी अंतरावर आहे .
मणेरी शेजारील गावांची माहिती
अंतर व स्थान
डोडामार्गपासून: अंदाजे 6 ते 7 किमी अंतरावर आहे
सावंतवाडीपासून: सुमारे 30 किमी अंतरावर आहे
सिंधुदुर्ग जिल्हा मुख्यालय (ओरोस) पासून: सुमारे 80 किमी अंतरावर
कोकण किनारपट्टीपासून: अंदाजे 35–40 किमी अंतरावर
गावाच्या शेजारील वस्ती आणि गावं
कुडसे
कुमब्राळ
झारे
कलाणे
वझारे
ही सर्व गावं मनेरीशी आतील ग्रामीण रस्त्यांनी आणि मुख्य दोडामार्ग –सावंतवाडी मार्गाने जोडलेली आहेत. काही ठिकाणी बस व खाजगी वाहनांची सुविधा उपलब्ध आहे.
मणेरी ग्रामपंचायतीचा मुख्य उद्देश काय आहे?
मणेरी ग्रामपंचायतीचा मुख्य उद्देश गावातील प्रत्येक नागरिकाला दर्जेदार सेवा पुरवणे आणि गावाचा सर्वांगीण, सर्वसमावेशक व शाश्वत विकास साधणे हा आहे.
मणेरी गावाची एकूण लोकसंख्या किती आहे?
जनगणना २०११ नुसार, गावाची एकूण लोकसंख्या १९७१आहे, ज्यामध्ये ९४७ पुरुष आणि ९६३ स्त्रिया आहेत.
सर्वसमावेशक विकासासाठी ग्रामपंचायती कोणती उपाययोजना करत आहे?
ग्रामपंचायतीत महिला, वृद्ध, मुलं, अनुसूचित जाती/जमाती, गरीब वर्ग यांसाठी विशेष योजना राबवून समाजातील प्रत्येक घटकाचा सहभाग सुनिश्चित केला जातो.
गावातील सार्वजनिक सुविधा कोणत्या आहेत?
मणेरीमध्ये १० स्ट्रीट लाईट खांब, 0१ आरोग्य उपकेंद्र, ११ सार्वजनिक विहीर,०४ जिल्हा परिषद शाळा आणि ०४अंगणवाड्या उपलब्ध आहेत.
गावात कोणत्या शैक्षणिक व बालकल्याण सुविधा आहेत?
गावात ०४ अंगणवाडी आणि ०४ जिल्हा परिषद शाळा आहे.
ग्रामपंचायत कार्यालयाचा पत्ता व संपर्क क्रमांक काय आहे?
ग्रामपंचायत कार्यालयाचा पत्ता: मणेरी
फोन क्रमांक: ९६०४१९२३२३
ई-मेल:manerigp18@gmail.com